Ashish Chanchlani : 'परिस्थितीशी लढू, तुम्ही मला पाठींबा द्या'; आशिष चंचलानीची अश्रू ढाळत चाहत्यांकडे विनंती!

मुंबई : कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (Indias Got Latent) या शोमध्ये रणवीर अलाहबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या वक्तव्यावरून  सगळीकडेच त्याच्यावर टीका होत आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी असणारे सर्व युट्यूबरसह इनफ्यूएनसर देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानीचा (Ashish Chanchlani) देखील समावेश असून समय रैना आणि रणवीर यांच्यावर होणाऱ्या टीकेचा परिणाम आशिष चंचलानीवर होत आहे. त्यातच आता आशिषने सोशल मीडियावर इमोशनल व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहावं अशी मागणी केली आहे.



"नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचे मेसेज वाचले... मी विचार केला होता की मी तुमच्याशी त्याबद्दल बोलायला जाईन, पण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा काय बोलावे ते मला समजत नाहीये. मी या परिस्थितीशी लढेन, मी इतके कठीण काळ पाहिले आहेत, मला यातूनही काहीतरी नवीन शिकायला मिळेल. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की मला आणि माझ्या कुटुंबाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा. आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा मी परत येईन, माझे काम थोडे बदलले आहे, पण जेव्हा परत काम सुरु करेन तेव्हा कृपया मला साथ द्या. आपण कठोर परिश्रम करू, मी नेहमीच कठोर परिश्रम केले आहेत," असे आशिषने (Ashish Chanchlani) व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, आशिषच्या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी 'तुझी काहीही चूक नव्हती' , तू टायगर आहेस. आम्ही कायमच तुझ्या सोबत आहोत.'  अशा कमेंट्स करत त्याला पाठिंबा दिला आहे. (Ashish Chanchlani)




Comments
Add Comment

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Sonu Nigam : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीवरून गायक सोनू निगमची सणसणीत ट्विटर पोस्ट, म्हणाला...

मुंबई : अभिनेत्री कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादात आता गायक सोनू निगमने (Sonu Nigam) भूमिका

Kon Honaar Crorepati : माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर; सूत्रसंचालक म्हणून स्वीकारलेल्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाली...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता एका नव्या आणि अनोख्या

Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

एक अभिनेता ज्याने जवळपास चार दशकं बॉलिवूड गाजवलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि तरीही त्याचं नाव ऐकताच थिएटरमध्ये

Toxic Movie : 'टॉक्सिक' सिनेमा कसा आहे ? यशचा स्वॅग भारी, पण 'केजीएफ'सारखी जादू चालणार का ?

मुंबई : 'केजीएफ २'च्या (KGF 2) अफाट यशाने अख्ख्या जगाला वेड लावणारा साऊथ सुपरस्टार यश (Yash) तब्बल चार वर्षांनंतर पडद्यावर

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे