SRA scheme : एसआरए योजनेतील घर यापुढे पति-पत्नीच्या नावे होणार

  133

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा महत्वाचा निर्णय


मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए - SRA scheme) घरावर यापुढे पति-पत्नी यांच्या संयुक्त नावाची नोंद होणार आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महानगरप्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत घेण्यात आला आहे.


महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतिच्या मालमत्तेमध्ये हक्क देणे ही मुलभूत गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पति-पत्नी यांना एकरूप एक घटक मानला जातो व प्राप्त संपत्ती दोघांची असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी त्यांच्या राहत्या घराची नोंद पति-पत्नी दोघांच्या नावे असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पतिच्या निधनानंतर पतिच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करताना महिलांना अनेक कायदेशिर अडचणींना सामोरे जावे लागते. जर आधीच पति-पत्नीचे हक्क झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-।। मध्ये असेल तर अशा अडचणी येणार नाहीत. यासाठी सुरूवात म्हणून पुर्नविकासानंतर मिळणारे घर हे पति आणि पत्नीच्या संयुक्त नावे करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेत प्राधिकरणाने आता संयुक्त मालकीवर शिक्कामोर्तब केला आहे.



झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सबलीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने अतिशय महत्त्व पुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निर्णयासंदर्भात परिपत्रक काढत प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झोपडपट्टीवासियांसाठी पुर्नविकासाअंतर्गत हा निर्णय लागू केला आहे.


प्राधिकरणाच्या या नव्या निर्देशानंतर सक्षम प्राधिकारी यांनी योजनेचे परिशिष्ट-2 निर्गमित करताना पति-पत्नी यांचे संयुक्त नावाने निर्गमित करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. परिशिष्ट-2 प्रमाणे पुनर्वसन इमारतीमध्ये सदनिका वितरित करतेवेळी सदनिका वाटपपत्रावर पति-पत्नी दोघांचे नाव नोंद करून सदनिका वितरीत करण्यात यावी. याव्यतिरिक्त सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनीही मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुनर्वसन योजनेतील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेस सदनिकाधारकांना भाग दाखला तसेच सदस्यत्व देते वेळी पतिसह पत्नीच्या नावाची "संयुक्त सभासद" म्हणून नोंद घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी