Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

वाल्मिक कराडला फाशी द्या, शिवसेनेचे मुंबईत जोरदार आंदोलन

वाल्मिक कराडला फाशी द्या, शिवसेनेचे मुंबईत जोरदार आंदोलन

राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा


मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशी द्या,या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले. संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.त्याचे पडसाद आज मुंबईत उमटले. शिवसेनेने वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी केली.


शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे शिवसेना महिला आघाडीकडून वाल्मिक कराडविरोधात आंदोलन करण्यात आले. वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. वाल्मिक कराड ही प्रवृत्ती आहे. काल व्हायरल झालेल्या फोटोंमधून या हत्याकांडाची भीषणता दिसून आली. अशा गोष्टी महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाण आहे. वाल्मिक कराडला केवळ शिक्षा होऊन चालणार नाही.


आरोपींना फाशी झालीच पाहिजे, ही शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. यासाठी राज्यभरात शिवसेना रान उठवेल, असे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या. यावेळी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी,तृष्णा विश्वासराव,संध्या वढावकर, कला शिंदे, उपनेते आनंदराव जाधव,अनिल पडवळ, युवासेना कार्यकारणी सदस्य निखिल जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment