Chura Ke Dil Mera : 'चुरा के दिल मेरा' या गाण्यावर अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी थिरकले

मुंबई : मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाली आहे. दोघांची जोडी 30 वर्षानंतर एकत्र पाहायला मिळाली. यानंतर दोघेही एकत्र एकाच स्टेजवर परफॉर्म करताना दिसले. सध्या दोघांचाही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


मुंबईत आयोजित एका इव्हेंटमध्ये काही कलाकार पोहोचले होते. यावेळी शिल्पा आणि अक्षयही त्याच ठिकाणी आले होते. सर्वजण व्हाईट आऊटफिटमध्ये होते. शिल्पा पांढऱ्या नेट साडीत खूप सुंदर दिसत होती. तर अक्षयही व्हाईट सूट बूटमध्ये डॅशिंग दिसत होता. दोघंही स्टेजवर असताना त्यांनी 'चुरा के दिल मेरा..' या त्यांच्या गाण्यावर डान्स केला. दोघांनीही तीच स्टेप करत गाणं रिक्रिएट केलं. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.







दरम्यान, अक्षय आणि शिल्पाचं अफेअर खूप चर्चेत आले होते. शिल्पाने मुलाखतींमध्ये अक्षयवरचं प्रेमही व्यक्त केलं होतं. मात्र नंतर अक्षयने तिचा विश्वासघात केला. यानंतर शिल्पा पूर्णत: खचली होती. त्यानंतर २००१ साली अक्षयने ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं. तर २००९ साली शिल्पा राज कुंद्रासोबत लग्नबंधनात अडकली. बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाल्यानंतर चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित

हेमंत ढोमे यांच्या शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील

हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात

‘शंकर जयकिशन’ची तालीम थेट हैदराबादला!

मराठी रंगभूमीवर लवकरच दाखल होणाऱ्या सुरज पारसनीस दिग्दर्शित ‘शंकर जयकिशन’ या नाटकाची तालीम थेट हैदराबादला

मराठी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये ‘लोकीज स्टुडिओ’ आघाडीवर !

मराठी चित्रपटसृष्टीत प्रमोशनच्या नवनवीन पद्धतींचा ठसा उमटवणाऱ्या क्रिएटिव्ह एजन्सींच्या यादीत आज चर्चेत