मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Actor Rashmika Mandana) तिच्या पुष्पा तसेच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा छावा या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. छावा चित्रपटात तिने मराठा साम्राज्याची महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. रश्मिका ने पुष्पा या सिनेमातून प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर तिला इंडस्ट्री मधून बऱ्याच प्रोजेक्टसाठी ऑफर देण्यात आली. मात्र आता तिच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाला काँग्रेसच्या बड्या आमदाराकडून धमकी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कर्नाटकचे आमदार रवी कुमार गोवाडा गनिगा यांनी मीडियाला दिलेल्या मुलाखतींमध्ये म्हटले की, अभिनेत्री रश्मिका मंदानाने किरीक पार्टी या कन्नड चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. गेल्यावर्षी आम्ही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आयोजित केला होता तेव्हा त्या कार्यक्रमासाठी तिला निमंत्रण दिलं होतं. मात्र माझं घर हैदराबाद मध्ये आहे मला कर्नाटक कुठे आहे माहित नाही, माझ्याकडे वेळ नाही अशी वेगवेगळी कारण देऊन रश्मिकाने कार्यक्रमात यायला नकार दिला.
जिथून रश्मिकाच्या करिअरची सुरुवात झाली त्या कन्नड भाषेकडे तिने दुर्लक्ष केलं आणि आमचं निमंत्रणही नाकारला त्यामुळे आम्ही तिला चांगलाच धडा का शिकवू नये? काँग्रेस आमदाराने दिलेली ही धमकी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान यावर अभिनेत्री रश्मिका मंदाना काय उत्तर देणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.