Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Eknath Shinde : अबू आजमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे; विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदे कडाडले

Eknath Shinde : अबू आजमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे; विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदे कडाडले

मुंबई : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करतो. अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली.



याबाबत निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. अबु आजमीसारखी माणसं शरीरानं भारतात राहात असली तरी मनानं मोगलाईतच जगत आहेत. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलंही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. औरंगजेब क्रुरकर्मा होता. तो कसला उत्तम प्रशासक. अशा राक्षसांची भलामण करणाऱ्या पिलावळीचा आम्ही धिक्कार करतो.


अबू आजमीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करीत उपमख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अबु आजमिंनी कितीही माजोरडी विधानं केलीत तरी त्याने इतिहास बदलणार नाही. कारण हा इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा आहे. पराक्रमाचा आहे.


नऊ वर्षात ६९ लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते. उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे सांगत “देश धरम पर मिटने वाला शेर शिवा का छावा था,महा पराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था” या ओळीने उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला.

Comments
Add Comment