मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई पालिकेकडून खासगी सार्वजनिक सहभाग प्रकल्प अंतर्गत मरोळ (अंधेरी पूर्व) येथील सेकन हिल्स रुग्णालयातील एकूण ३०६ सणशय्यांपैकी २० टक्के म्हणजे ६१ रुग्णशय्या मुंबई महानगरपालिका संदर्भित रुग्णांसाठी राखीव आहेत. या राखीय रुग्णशय्या सुविधा अंतर्गत सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर शासकीय योजना आदींची रुग्णालयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे या रुग्णालयात गरीब रुग्णांनाही उपचार घेता येत आहे.
रुग्णालयाचे संचालन करण्यात येत आहे. या रुग्णालयारला मुंबई पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी रविवारी भेट दिली. रुग्णालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती घेतल्यानंतर गगराणी यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार, सेशन हिस्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महारुद्र कुंभार, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे सल्लागार शंकर कृष्णमूर्ती आदी या पाहणीवेळी उपस्थित होते.
या पाहणीवेळी पालिका आयुक्त गगराणी यांना अधिका-यांनी सविस्तर माहिती सादर केली. सेव्हन हिल्स रुग्णालपातील प्रमुख वैद्यकीय सुविधा, ५० ग्णशय्या असलेल्या अतिदक्षता विभागातील सेवा-सुविधा, डायलिसिस सेवा, रोग निदान, बाह्यरुग्ण विभाग आदी सेवांचीही त्यांनी पाहणी केली. त्यासोचतब वाहनतळ आणि इतर ठिकाणी जाऊन स्वच्छता, देखभाल इत्यादी कार्यवाही सुव्यवस्थित होते आहे किंवा कसे याचीही त्यांनी पाहणी केली. प्रमुख वैधकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, मुंबईतील पश्चिम उपनगरांसह लगतच्या पूर्व उपनगरातील रुग्ण देखोल या रुग्णालयात येतात. या ठिकाणी विशेष तसेच अतिविशेष स्वरुपाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात. सद्यस्थितीत २०६ रुग्णशय्या क्षमता असलेल्या या रुग्णालयात कार्डिओलॉजी, न्यूरोलोनी, मेडिसीन सर्जरी यासह अनेक उपचार सेवा पुरविण्यात येतात. सीप्झ, विमानतळ आदी ठिकाणाहून तातडीचे उपचार आवश्यक असणारे रुग्ण देखील येथे येतात.
परिसरातील मरोळ, सीप्झ आदी मेट्रो रेल्वे स्थानके लक्षात घेता नागरिकांना सेव्हन हिल्स रुग्णालयात येणे अधिक सोमीरकर होऊ लागले आहे, असे त्यांनी नमूद केले. विशेष कार्य अधिकारी डॉ. कुंभार यांनी माहिती दिली को, सेव्हन हिल्स रुग्णालयातील एकूण ३०६ रुग्णशव्यांपैकी २० टक्के महणजे ६१ रुग्णशय्या मुंबई महानगरपालिका संदर्भित रुग्णांसाठी राखीव आहेत, मा राखीच रुग्णशव्या सुविधा अंतर्गत सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्या जातात. तसेच, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर शासकीय योजना आदींची रुग्णालयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयाशी संबंधित प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण यांच्याकडे न्यायप्रविष्ट आहे, असे सांगून त्याबाबत सुरू असलेल्या प्रशासकीय कार्यवाहीची संक्षिप्त माहिती देखील डॉ. कुंभार यांनी सादर केली. तसेच परिसरातील एकूणव स्वच्छता, परिरक्षण याबाबतही त्यांनी कौतुक केले.