कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा, लेझीम, फुगडी, लगोरी, विटी-दांडूसह १२ खेळांचा समावेश
मुंबई (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘महाकुंभ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २ ते ९ मार्च पर्यंत हा क्रीडा महाकुंभराज्यात सुरू राहणार आहे. या क्रीडा महाकुंभात कब्बडी आणि खो-खो या जागतिक दर्जाच्या खेळांबरोबर लगोरी, लेझीम, लंगडी, विटी दांडू यांसह १२ पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. २ आणि ३ मार्च रोजी आयटीआय स्तरावर, ४ आणि ५ मार्च रोजी जिल्हास्तरावर, तर ७ ते ९ मार्चपर्यंत नाशिक विभागीय स्तरावर या क्रीडा कुंभाची सांगता होईल, विजेत्यांना आकर्षक पारितोषिक तर सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. तसेच इच्छुक खेळाडूंनी क्रीडा कुंभसाठी नियुक्त केलेले प्रभारी किंवा संबंधित आय.टी. आयच्या मुख्याध्यापकांकडे नोंदणी करायची आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले असून ते रिफंड अर्थात पुन्हा स्पर्धकांना परत देण्यात येणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राच्या मातीत खेळल्या जाणाऱ्या दंड बैठक, लेझिम, पंजा लढवणे, लंगडी, दोरीवरच्या उड्या, कब्बडी, फुगडी, खो-खो, विटी दांडू या पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेत सहभाग घेऊन खेळांना आणखी दर्जेदार करून आपली मराठी संस्कृती जपावी असे आवाहन मंत्री लोया यांनी केलेल