Monday, June 16, 2025

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ६४८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार ३ मार्चपासून सुरू झाले. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ६४८६.२० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. यात ९३२.५४ कोटी रुपयांच्या अनिवार्य, ३४२०.४१ कोटी रुपयांच्या कार्यक्रमाशी संबंधित, २१३३.२५ कोटी रुपयांच्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाशी संबंधित आहेत. सभागृहात ६४८६.२० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर झाल्या असल्यास तरी राज्यावर ४२४५.९४ कोटी रुपयांचाच थेट भार पडणार आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतरच हा खर्च करता येईल.



पुरवणी मागण्यांविषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा

आर्थिक वर्ष संपण्याच्या सुमारास दरवर्षी अतिरिक्त खर्चांसाठी तसेच अचानक निघालेल्या खर्चांसाठी मर्यादीत प्रमाणात पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. यंदाही त्याच पद्धतीने पुरवणी मागण्या सादर होत आहेत. हा अवास्तव खर्च नाही. जनहिताच्या विविध योजनांसाठीच हा पैसा खर्च होणार असल्याचे राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >