Thursday, March 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजJitendra Awhad : नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव

Jitendra Awhad : नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव

Jitendra Awhad : विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या खासदारांनी लोकसभेच्या अधिवेशनात परराष्ट्र मंत्र्यांसमोर निषेध नोंदवावा – आनंद परांजपे

मुंबई : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून निदर्शने करावी, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी लगावला आहे.

दरम्यान नकलाकार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव आहे. असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी केला आहे.

लोकशाहीत आमचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधानभवन परिसरात बेड्या घालून प्रवेश केला. याबाबतची बाईट पाहिली परंतु हाच मिडिया रोज विविध विषयांवर ठाणे येथे बंगल्यावर असो किंवा पक्ष कार्यालयात असो सातत्याने या सरकारच्या विरुद्ध जितेंद्र आव्हाड ज्या – ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात या सर्वांना माध्यमे कव्हरेज देतात मग आवाज कसा दाबला जातो, असा सवालही आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे.

प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल

लोकशाहीत विरोधकांनी आपली सकारात्मक भूमिका मांडली पाहिजे. आणि नेहमी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मांडत असतात. पण आज मी काहीतरी स्टंट केला पाहिजे, काहीतरी मी वेगळा आहे हे दाखवले पाहिजे म्हणून हा खटाटोप होता. मात्र दुर्दैवं असे की, ही स्टंटबाजी करताना त्यांच्या पक्षाचा एक आमदारही सोबत नव्हता, असा खोचक टोलाही आनंद परांजपे यांनी लगावला.

अमेरिकेहून भारतीय नागरिक पुन्हा भारतात पाठवले गेले. त्यांच्या हातात बेड्या होत्या. खरंतर देशाचे परराष्ट्र धोरण हे ना महाराष्ट्राच्या विधानभवनात, ना विधानपरिषदेत ठरते तर ते ठरते देशाच्या लोकसभेत आणि राज्यसभेत याची आठवण करून देताना आनंद परांजपे यांनी अमेरिकेतून भारतीयांना परत पाठवण्यात आले याचा निषेध करायचा असेल तर लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन दुसर्‍या सत्रात सुरू होईल तेव्हा खासदारांनी बेड्या घालून निषेध नोंदवावा, असेही आनंद परांजपे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -