मुंबई: अंबानी कुटुंबातील मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मोठी सून श्लोका मेहता हिला पावर कपल मानले जाते. या दोघांमधील बाँडिंग आणि एकमेकांबद्दलचे प्रेम चाहत्यांसाठी नेहमीच आदर्शवादी ठरते.
आकाश आणि श्लोका अनेकदा डेट नाईट्स एन्जॉय करताना दिसतात मात्र तो आपल्या मित्रांसोबत वेळ घालवतानाही दिसतो. दरम्यान, नुकतेच एका संवादादरम्यान त्याला पत्नी आणि मित्र यांच्यापैकी एकाला निवडण्यास सांगितले. मात्र त्यावेळेस त्याने दिलेले उत्तर हे हैराणजनक होते.
एका मुलाखतीत आकाशला प्रश्न विचारण्यात आला की श्लोकासोबत नाईट आऊट की मित्रांसोबत गेमिंग नाईट यापैकी काय निवडणार? अंबानी कुटुंबातील या मोठ्या मुलाने याचे मजेशीर उत्तर दिले. यावर लोकांचा हशा पिकला. आकाशने म्हटले, माझी इच्छा आहे की श्लोकासोबत मी गेमिंग नाईटला जावे.
त्याचे हे उत्तर ऐकून एकीकडे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. मात्र सगळेचजण त्यांच्यामधील बाँडिंगची स्तुती करत होते.