हरियाणा : हरियाणाच्या रोहतक येथील काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन नामक आरोपीला अटक केली असून सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून हिमानीची हत्या केल्याचा दावा आरोपीने केला आहे.
रोहतक येथे १ मार्च २०२५ रोजी एका सुटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी बहादुरगड येथील सचिन नामक आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
Pune Mumbai ExpressWay : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कोट्यवधींचे चंदन जप्त
आतापर्यंत पुढे आलेल्या माहितीनुसार हिमानी आणि सचिन हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. सचिन आणि हिमानी यांची मैत्री १ वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. त्यानंतर हिमानीने सचिनला तिच्या घरी बोलावले होते. या दोघांमध्ये शारीरिक संबंध बनले. हिमानीने या संबंधांचा व्हिडिओही बनवला. हिमानीने याचा वापर करत सचिनला ब्लॅकमेल केले होते. हिमानीला आतापर्यंत ३ लाखाहून अधिक पैसे दिल्याचा सचिनने दावा केला.
बहादुरगड येथील आरोपी सचिन कानोडा गावात मोबाईल ऍक्सेसरीजचे दुकान चालवतो. सचिन विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. आरोपीने सांगितले की, आतापर्यंत हिमानीला त्याने ३ लाख रुपये दिले आहेत. पण ती अधिक रुपयांची डिमांड करत होती. गेल्या २ मार्च रोजी हिमानीने सचिनला घरी बोलावलं आणि ती आणखी पैशाची डिमांड करु लागली. सचिनने हिमानीला खूप समजवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्याने मोबाइल चार्जरच्या तारेने गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेह घरात सोडूनच तो आपल्या गावातील दुकानात गेला. हिमानीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पुन्हा तिच्या घरी आला. सुटकेसमध्ये मृतदेह भरून ती सुटकेस बसस्टँडवर सोडून दिली होती.