Monday, March 24, 2025
Homeक्रीडाविदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा जिंकली रणजी ट्रॉफी

नागपूर : विदर्भाने सात वर्षात तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. यंदा रणजी ट्रॉफी २०२४ – २५ चा अंतिम सामना विदर्भ आणि केरळ यांच्यात झाला. करुण नायरने दोन्ही डावात छान फलंदाजी केली. त्याने दुसऱ्या डावात शतक झळकावले. यामुळे विदर्भाने अंतिम सामन्यात केरळचा सहज पराभव केला.विदर्भाने याआधी २०१७ – १८ आणि २०१८ – १९ मध्ये रणजी ट्रॉफी जिंकली. विशेष म्हणजे २०२४ – २५ च्या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भ संघाने एकही सामना गमावलेला नाही.

रणजी ट्रॉफी २०२४ – २५ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे केरळला भोवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने पहिल्या डावात सर्वबाद ३७९ आणि दुसऱ्या डावात ९ बाद ३७५ धावा केल्या. तर केरळने पहिल्या डावात सर्वबाद ३४२ धावा केल्या. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलेल्या करुण नायरने विदर्भाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. करुणने पहिल्या डावात ८६ आणि दुसऱ्या डावात १३५ धावा केल्या. सामनावीर झालेल्या विदर्भच्या दानिशने पहिल्या डावात १५३ आणि दुसऱ्या डावात ७३ धावा केल्या. विदर्भचाच हर्ष दुबे मालिकावीर झाला. नियमानुसार पाच दिवसांचा खेळ संपल्यानंतर सामना अनिर्णित जाहीर करण्यात आला.

रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना अनिर्णित राहिला, तर पहिल्या डावाच्या आधारे जास्त धावा करणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते. विदर्भ विरुद्ध केरळ अंतिम सामन्यात, विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा केल्या होत्या. केरळने पहिल्या डावात ३४२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे विदर्भाने ३७ धावांची आघाडी घेतली होती.

यंदाच्या रणजीच्या हंगामात विदर्भ संघाने सर्वोत्तम कामगिरी केली, त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या हंगामात विदर्भ संघ आठ सामने खेळला. यातील सात सामन्यांत त्यांचा विजय झाला आणि एक सामना अनिर्णित राहिला. याउलट केरळ संघ सात पैकी तीन सामने जिंकला. पण त्यांचे चार सामने अनिर्णित राहिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -