Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीSharad Ponkshe : शरद पोंक्षे यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान

Sharad Ponkshe : शरद पोंक्षे यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान

मुंबई : सुप्रसिद्ध कलावंत व व्याख्याते शरद पोंक्षे यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विचार मंच’ या अतिशय प्रतिष्ठित अशा सामाजिक संस्थेतर्फे, संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र भाजपाचे राज्य प्रवक्ता अवधूत वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Akola ST Bus : अकोल्यात धावती एसटी बस आगीच्या भक्ष्यस्थानी

याचबरोबर ‘पुरुष’ नाटकाचे नाटककार जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पुरुष’ नाटकाचे निर्माते संतोष काणेकर, श्रीकांत तटकरे तसेच दिग्दर्शक राजन ताम्हाणे कलाकार अविनाश नारकर, स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, नेहा परांजपे, निषाद भोईर, संतोष पैठणे, ऋषिकेश रत्नपारखी तसेच या नाटकाचे पुरस्कर्ते राजेश गाडगीळ यांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दादर येथील शिवाजी मंदिरात रंगलेल्या या कार्यक्रमाला चित्रपट व रंगभूमी क्षेत्रातील अनेक दिगजांसहित मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -