मुंबई : मुंबई पालिकेच्या ताब्यात असलेल्या प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये कुणीही प्रकल्पबाधित जायला तयार नसल्याने आता सदनिका प्रशासनाने विक्रीला काढल्या असून माहुलमधील या सर्व सदनिकांची कामगारांना विक्री करण्यासाठी महापालिकेने जाहीर केली असून येत्या १५ मार्चपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात होणार आहे. या सदनिकांचा लाभ चतुर्थ श्रेणी आणि तृत्तीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना होणार आहे.
एमएमआरडीएच्या वतीने बांधलेल्या सदनिका महापालिकेला विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी हस्तांतरीत केल्या आहेत. माहुल आंबा पाडा येथील एवर स्माईल, एस जी केमिकल, व्हिडीओकॉन अतिथी आदी ठिकाणच्या बऱ्याच सदनिक या प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केल्यानंतर रिक्त आहेत. या सर्व रिक्त सदनिकांची संख्या १३ हजारांच्या आसपासून असून या ठिकाणी कोणीही प्रकल्प बाधित जाण्यास तयार नसल्याने या सदनिका पडून आहेत. या सर्व सदनिकांची विक्री महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना करण्यात येणार आहे.
याबाबत महापालिका प्रशासनाच्यावतीने जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ही या योजना केवळ महानगरपालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल,असे प्रशासनाने नमुद केले आहे.
पालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबई मध्ये घर उपलब्ध करून, त्यांच्या प्रवासाचा वेळ कमी करणे आणि कामाची क्षमता वाढवणे हे ही योजना राबवण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे या याजनेच्या माध्यमातून पालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत घर घेण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या योजने मध्ये, माहुल, एस.जी. केमिकल व विडीयोकॉन अतिथी येथील एक सदनिका १२.५ लाख रुपये अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क व दोन सदनिका २५.०० लाख अधिक मुद्रांक व नोंदणी शुल्क या दराने विकण्याचे नियोजित केले आहे.
कर्मचाऱ्यास १ किंवा २ (जोडी) सदनिका विकत घेण्याची मुभा तथा पर्याय असेल. तसेच त्यांनी त्यानुसार अर्जा मध्ये नमूद करायचे आहे. त्यामुळे सर्व खाते प्रमुखाने आपल्या आधिपत्याखालील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या योजने बाबत अवगत करावे तसेच पालिकाच्या सर्व संघटनेस अवगत करावे, असेही या जाहिरितीत नमुद केले आहे.
लॉटरी सोडतीचा कार्यक्रम
-
शनिवारी (१ मार्च) या घरांच्या सोडत योजनेसाठी जाहिरात प्रकाशित
-
येत्या १५ मार्चपासून ऍपद्वारे ऑनलाईन अर्जाला सुरुवात
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ एप्रिल
-
येत्या १६ एप्रिला सर्व अर्जांची यादी होणार प्रसिध्द
-
लॉटरीची सोडत २० एप्रिला काढली जाणार
-
यशस्वी अर्जदारांना अनामत रक्कम भरण्याची दि.२० एप्रिल ते ५ मे
-
अर्जदारांनी ५ मे ५ जूनपर्यंत सदनिकाच्या एकूण किमतीचे २५ टक्के किंवा पूर्ण रक्कम भरणे.