Monday, June 30, 2025

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्यांविषयी फडणवीसांचा गौप्यस्फोट

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्यांविषयी फडणवीसांचा गौप्यस्फोट
रायगड : केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे यांच्या मुलीची तसेच इतर काही मुलींची छेड काढण्याचा प्रकार मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेत घडला. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक गौप्यस्फोट के ला. छेड काढणाऱ्यांपैकी काही जण दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे सदस्य असल्याचे ते म्हणाले. छेडछाड प्रकरणी पोलीस कारवाई सुरू आहे. दोषींवर कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई होणार असल्याचे फडणवीस म्हणाले. याआधी छेड प्रकरणी मुलींनी पोलिसांना माहिती देऊनही कारवाई झाली नाही. अखेर राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीच पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला.





नेमके काय घडले ?

मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेत रक्षा खडसे यांच्या मुलीची तसेच इतर काही मुलींची छेड काढण्यात आली. यात्रेत घटना घडली त्यावेळी त्या भागात एक पोलीस होता. मुलींनी तक्रार करताच तो पोलीस घटनास्थळी आला. पण छेड काढणारे गटाने उभे होते. संख्येने जास्त असल्याचा गैरफायदा घेत त्यांनीच पोलिसाला मारहाण केली, त्यानंतर या प्रकरणात पोलिसांची कारवाई थंडावली आहे; असे एकनाथ खडसे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच दखल घ्यावी आणि छेड काढणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
Comments
Add Comment