Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबई एअरपोर्टवर ११ कोटींचे कोकेन जप्त, विदेशी महिलेला अटक

मुंबई एअरपोर्टवर ११ कोटींचे कोकेन जप्त, विदेशी महिलेला अटक

मुंबई : मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआयने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका ब्राझिलियन महिला अटक केली. या महिलेकडून पोलिसांनी तब्बल ११ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे.

मुंबईमध्ये ड्रग्जची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ब्राझिलियन महिलेला पोलिसांनी अटक केली. ही महिला मुंबई एअरपोर्टवर दाखल झाली. तेव्हा ती सतत पोटाला हात लावत होती. त्यामुळे पोलिसांनी तिची विचारपूस केली. यावेळी या महिलेची चौकशी केली असता पोलिसांना समजले की, या महिलेने कोकेनच्या तब्बल १०० कॅप्सूल गिळल्या होत्या. पण तिचा मुंबईत कोकेन आणण्याचा प्रयत्न फसला.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साओ पाउलोहून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलेल्या महिलेला अटक केली. या महिलेच्या चौकशीनंतर तिने भारतात तस्करी करण्यासाठी कोकेन कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली. त्यानंतर या महिलेला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या शरीरातून १,०९६ ग्रॅम कोकेन असलेले सुमारे १०० कॅप्सूल जप्त करण्यात आले. या कोकेनची किंमत १०.९६ कोटी रुपये आहे.

एनडीपीएस कायद्यांतर्गत हे कोकेन जप्त करण्यात आले आणि त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. केंद्रीय एजन्सीने तिच्यावर अनेक आरोप लावले आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणे याचा समावेश आहे. या आरोपासाठी या महिलेला २० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -