Friday, October 17, 2025
Happy Diwali

विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माने भर स्टेडियममध्ये दिली अशी प्रतिक्रिया

विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माने भर स्टेडियममध्ये दिली अशी प्रतिक्रिया

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.या सामन्यात विराट कोहली फक्त ११ धावांवर बाद झाला.विराट बाद झाल्यानंतर अनुष्काची प्रतिक्रिया स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. तेव्हाचा अनुष्का शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील आजचा सामना पाहण्यासाठी दुबईच्या स्टेडियममध्ये हजर होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्काची काय प्रतिक्रिया काय होती ते पाहायला मिळते. कोहली अवघ्या ११ धावांवर बाद झाल्यानंतर अनुष्काने कपाळाला हात लावला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही क्षणात नाहीसा झाला. कपाळावर हात मारल्यानंतर अनुष्का काहीतरी अस्पष्ट बोलल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. अनुष्काच्या तोंडी चुकून अपशब्द आल्याचे काही यूजर्सनी म्हटले आहे.

विराट कोहलीसाठी आजचा सामना महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या कारकीर्दीतला हा ३०० वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आहे. पण या सामन्यात तो लवकर बाद झाला. सातव्या षटकामध्ये कोहलीने ऑफ साइडला शॉट मारला. पॉइंटवर उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्सने हवेत उंच उडी मारत झेल घेतला आणि विराटला बाद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा