मुंबई : ‘स्टूडंट ऑफ द इयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली आलिया भटचा (Alia Bhatt) मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. त्यामुळे आलिया भट नेहमीच चर्चेत असते. मात्र आता आलियाच्या एका कृतीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. आलिया आणि रणबीर कपूरची (ranbir kapoor) लेक राहा (raha kapoor) अनेकदा बाहेर एकत्र दिसतात. निरागस राहा अनेकदा पापाराझींना ‘हाय हॅलो’ करताना दिसते. पण नुकतेच आलियाने राहाचे सर्व फोटो इन्स्टाग्रामवरुन डिलीट केले आहेत. यामुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Mumbai Weather : सकाळी गारवा, दुपारी उन्हाच्या झळा! पाहा मुंबईत कसे असेल आठवड्याचे तापमान
अभिनेता सैफ अली खानच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा चांगलाच धसका अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने घेतला आहे. या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन राहाचा चेहरा दिसत असणारे सर्व फोटो डिलीट केले आहेत. कुटुंबाच्या आणि लेकीच्या प्रायव्हसी आणि सुरक्षिततेचा विचार करून आलियाने हा निर्णय घेतला आहे. तसेच आलियाने पापाराझींना देखील राहाचे फोटो काढण्यास मनाई केली आहे.
दरम्यान, मुलीच्या सुरक्षिततेसाठी आलियाने घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र वाहवाह केली जात आहे. मात्र यामुळे राहा तिच्या चाहत्यांसमोर येणार नाही, तसेच तिचे निरागस फोटो पाहायला मिळणार नसल्यामुळे चाहतावर्ग काहीसा नाराज झालेला आहे.