सुक्रे : बोलिव्हियामध्ये दोन बसची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.यात ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३९ हून अधिक जण जखमी झाले आहेत. उयुनी आणि कोलचानी दरम्यानच्या महामार्गावर पहाटेच्या सुमारास एक बस चुकीच्या लेनमध्ये गेल्याने हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उयुनी आणि कोलचानी शहरांमधील मार्गावर पहाटेच्या सुमारास एक वाहन समोरून येणाऱ्या लेनमध्ये घुसल्याने हा अपघात झाला.या प्राणघातक अपघातामुळे ३९ जण जखमी झाले आहेत आणि ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे,” असे पोटोसीच्या विभागीय पोलिस कमांडच्या प्रवक्त्याने सांगितले.
Pune ST Corporation : एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्यांची नेमणूक होणार
या अपघातातील जखमींवर उयुनी शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील मृतांची ओळख पटवण्याचं आणि जखमींना मदत करण्याचं काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.या अपघातातील एक बस ओरुरो शहराकडे जात होती, जिथे वीकेंड ओरुरो कार्निव्हल आयोजित केला होता. घटनास्थळी, एका बसला एका क्रेनने उलटे केले, आणि पोलिस अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहनांमधून मृतदेह काढत त्यांना ब्लँकेटमध्ये गुंडाळून घेऊन जाताना दिसत होते.
बोलिव्हिया सरकारच्या मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या बस अपघाताचं प्रमुख कारण जास्त वेग असू शकतो. तसेच एक बस विरुद्ध लेनमध्ये गेली होती, ज्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या अपघाताची सखोल चौकशी केली जात आहे.