Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेमीरा -भाईंदर नवी ओळख MH -58

मीरा -भाईंदर नवी ओळख MH -58

मंत्री, प्रताप सरनाईक यांची मीरा-भाईदरच्या नागरिकांना गोड भेट..

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास शासनाची मंजुरी

मीरा -भाईंदर : १ मार्च हा परिवहन विभागाचा (RTO ) स्थापना दिवस ” परिवहन दिन ” म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्याला परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर येथील रहिवाशांसाठी ” गुड न्यूज ” दिली आहे. राज्यातील ५८ वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले आहे. त्या संदर्भातला शासन निर्णय आज शासनाने जाहीर केला आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून सन २००९ पासून मीरा-भाईंदर येथील रहिवाशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्न मुळे मीरा-भाईंदर येथे परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होत आहे. उतन्न येथील शासनाकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीवर हे प्रशस्त कार्यालय भविष्यात उभे राहील त्याचबरोबर ८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते संपन्न होत आहे. याबरोबरच भविष्यात पोलीस आयुक्तालयाचे देखील कार्यालय या परिसरात निर्माण होईल, असा विश्वास मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मीरा-भाईंदर येथील वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात वाढणारी वाहनधारकांची संख्या लक्षात घेता शासनाने येथे 58 वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय आज जारी केला. कित्येक वर्ष यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री प्रताप सरनाईक हे या साठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. याबरोबरच लवकरच मीरा-भाईंदर येथे दिवाणी न्यायालयाचे इमारतीचे उद्घाटन होत आहे. भविष्यात पोलीस आयुक्तालय देखील मीरा -भाईंदर साठी निर्माण करण्याचे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -