मुंबई : मुंबईकरांची शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील (Shivaji Park) धुळीमुळे रहिवासी त्रस्त झाले. मैदानात माती टाकण्यात आल्याने काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने रहिवाशांमध्ये श्वसनविकार बळावत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
Shivaji Park : धुळीच्या त्रासापासून मुक्तता मिळावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांप्रमाणेच खेळाडूही करत आहेत.
Shivaji Park : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा प्रश्न सुटण्याचे काही चिन्ह दिसत नसून मुंबई आयआयटीच्या सूचनेनुसार मैदानावर गवत पेरणी करण्यास अद्याप सुरूवात झाली नाही. तर मैदानावर गवत पेरणी करण्यापेक्षा माती काढण्याचीच गरज असल्याचे येथील काही रहिवाशांचे म्हणणे आहे.
Shivaji Park : या प्रश्नावर काहीच तोडगा निघत नसल्याने शिवाजी पार्क रहिवासी संघटनेने आता न्यायालयीन लढाई लढण्याचे ठरवले आहे. त्याकरीता उच्च न्यायालय किंवा हरित लवादाकडे दाद मागण्याचा रहिवासी संघटनेचा विचार आहे.