Sunday, August 24, 2025

स्वारगेट बलात्कार प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर येथून अटक

स्वारगेट बलात्कार प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर येथून अटक

मुंबई: पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पोलिसांना आरोपीला पकडण्यात मोठे यश मिळाले आहे. ३७ वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास गाडेला पुण्याच्या शिरूर येथून अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा तो कोणाच्या तरी घरी पाणी पिण्यासाठी गेला होता. पाणी पिऊन तो गावातच एका ठिकाणी लपण्यासाठी निघून गेला. पण तोपर्यंत ग्रामस्थांनी त्याला बघितले होते. तसेच पोलिसांच्या ड्रोननेही आरोपी गावात असल्याचे फूटेज पोलिसांना पाठवून दिले होते. ही सर्व माहिती हाती येताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

आरोपीला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याला आज पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी गाडेवर आधीपासूनच चौरी, चेन-स्नेचिंग अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१९मध्ये तो एका गुन्हे प्रकरणात जामिनावर बाहेर होता. आरोपी दोन दिवसांपासून फरार होता. यानंतर पोलिसांनी त्याच्या तपासासाठी १३ विशेष पथके बनवली होती. या प्रकरणी आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी एक लाख रूपयाच्या बक्षिसाची घोषणा केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा