Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेThane News : विद्यार्थ्यांची उन्हापासून सुटका! जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल

Thane News : विद्यार्थ्यांची उन्हापासून सुटका! जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल

ठाणे : तप्त उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असून त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. आज मितीस तब्बल ४० अंशापर्यंत पारा पोहचला असून (Heat Wave) पुढील दोन महिन्यांत यात कमालीची वाढ होण्याची शक्यता असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला होणारा धोका लक्षात घेत ठाणे जिल्हा परिषदेने शाळेच्या (ZP School) वेळेत बदल केला आहे. दुपार सत्रात होणाऱ्या सर्वच शाळा आता सकाळ सत्रात होणार असल्याने विद्यार्थ्यांची उन्हाच्या तडाख्यातून सुटका होणार आहे. ठाणे जिल्हापरिषदेच्या (Thane News) या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिलासा मिळाला आहे.

…तर भारत-अफगाणिस्तान यांच्यात रंगेल सेमीफायनल!

ठाणे जिल्हापरिषदेच्या एकूण एक हजार ३२८ शाळा असून पहिली ते आठवी पर्यंत तब्बल ८० हजार ९९१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पूर्वीच्या परिपत्रकानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांची वेळ सकाळी १० : २० ते संध्याकाळी पाच पर्यंत होती. मात्र फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले असून एप्रिल व मे महिन्यात पारा कमालीचा वाढलेला असतो. त्यामुळे जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा सोसावा लागतो तसेच समुद्र जवळ असल्याने हवेतील आद्रतेमुळे उकाड्याचे प्रमाणही अधिक असते. त्यातच अनेक जिल्हा परिषद शाळांना पत्र्याचे शेड आहेत. उन्हाची तीव्रता आणि उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांनी शाळेच्या वेळेत बदल केला असल्याने ग्रीष्म काळात या जिल्हा परिषदांच्या शाळा सकाळी ७.३० पासून सकाळ सत्रात भरविल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे व प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विनोद लुटे यांनी शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. १५ मार्च पासून ठाणे जिल्हापरिषदेच्या शाळा सकाळी सात ते दुपारी १२ : ३० पर्यंत भरविल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून (Education Department) सांगण्यात आले. यामुळे रखरखीत उन्हाच्या तडाख्यापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होणार आहे. (Thane News)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -