Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

दत्तात्रय गाडेला फासावर लटकावण्यासाठी पाठपुरावा करणार, रुपाली चाकणकरांनी दिले संकेत

दत्तात्रय गाडेला फासावर लटकावण्यासाठी पाठपुरावा करणार, रुपाली चाकणकरांनी दिले संकेत
पुणे : स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये कोंडून तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी शिरुरमधून अटक केली. या प्रकरणात आरोपीला फाशी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. तसेच महिलांच्या विरोधातल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाय करावे, यासाठीही राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार असल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या.





राज्य महिला आयोगाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी जिल्ह्यातील सर्व एसटी डेपो आणि एसटी बस येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीत महिला सुरक्षेसाठी करायच्या उपायांबाबत चर्चा होणार आहे; असे रुपाली चाकणकर यांनी एक्स पोस्ट करुन सांगितले.

याआधी स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये कोंडून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. आरोपी दत्तात्रय गाडे घटनास्थळावरुन फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा फोटो प्रसिद्ध केला होता. शिरुरमधील गुनाट गावात आरोपी लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली आणि आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पुण्यात आणले. लवकरच त्याला न्यायालयात हजर केले जाईल. आरोपीची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करणार आहेत.
Comments
Add Comment