Chinchpokli Fire : चिंचपोकळीत अग्नितांडव! निर्मल पार्क इमारतीला भीषण आग

मुंबई : मुंबईतील चिंचपोकळी परिसरात भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. रंगारी बदक चाळ परिसरातील निर्मल पार्क इमारतीमधील काही मजल्यांना आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या  १० ते १२ गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, आग लागल्याचे नेमकं कारण समोर आलेले नाही. (Chinchpokli Fire)