Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीLucky Digital Grahak Yojana : महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू

Lucky Digital Grahak Yojana : महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू

नागपूर : वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. एक जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीनपेक्षा अधिक वीजबिले ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नागपूर परिमंडलात अद्यापही घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सुमारे १४ लाख ग्राहकांपैकी केवळ नऊ लाख ग्राहक ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरत आहेत. उरलेल्या ग्राहकांनाही रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘महावितरण’ने ही अनोखी बक्षीस योजना आणली आहे. वीजबिल ऑनलाइन भरण्यासाठी ‘महावितरण’ ने संकेतस्थळ, मोबाइल ऍप उपलब्ध करून दिलेले आहे. ग्राहकांना देय रकमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते.

ऑफलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांनी पहिल्यांदाच ऑनलाइन बिल भरल्यावर त्यांना स्क्रिनवर गो-ग्रीनची पॉप-अप दिसणार आहे. गो-ग्रीन योजनेत ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना एकरकमी १२० रुपये सूट दिली जाईल. गो-ग्रीनमध्ये पुढील प्रत्येक ग्राहकाला ई-मेल व मोबाइलवर मिळेल. त्यामुळे ग्राहकाला एक टक्का प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंटही मिळवता येते.

AI Robot : चीनमध्ये एआय रोबोट नियंत्रणाबाहेर, लोकांवर केला हल्ला

महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाइन काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत. योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाइन पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने वीजबिल भरणे आवश्यक आहे. वीजबिल भरणा केलेली रक्कम किमान १०० रुपयांच्यावर असायला हवी. लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वीच्या महिन्याच्या अंतिम दिवशी ग्राहकाची थकबाकीची रक्कम १० रुपयांपेक्षा कमी असावी. एक ग्राहक क्रमांक केवळ एका बक्षिसासाठी पात्र राहील.

नागपूर परिमंडलात जानेवारी महिन्यात १४ लाख ७९ हजार ५३७ ग्राहकांनी १९७ कोटी ४९ लाख रुपयांची वीजबिले ऑनलाइन भरली आहेत. ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच ‘महावितरण’च्या मोबाइल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही कितीही रकमेचे वीजबिल ऑनलाइन भरता येते. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीजबिल भरण्यास कसलेही शुल्क लागत नाही. वीजबिलांचे ऑनलाइन पेमेंट अत्यंत सुरक्षित असून, त्यास रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतूदी लागू आहेत.

वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट केल्यावर ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच www.mahadiscom.in या वेबसाईटवर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास वीजबिल भरणा तपशील व पावतीही उपलब्ध होते. त्यामुळे ऑनलाइन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

लकी डिजिटल ग्राहक योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी एक एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीजबिल भरलेले नाही किंवा वीज बिल ऑनलाइन भरलेले नाही. ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा वीजबिल ऑनलाइन भरणारे सर्व लघुदाब वीजग्राहक योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -