Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Mahasangam : कुंभमेळ्यावर होणार चित्रपट! 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

Mahasangam : कुंभमेळ्यावर होणार चित्रपट! 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

मुंबई : नुकतेच प्रयागराजमधील ४५ दिवसांचा महाकुंभ संपला आहे. परंतु त्याच्या भव्य कार्यक्रमाबद्दल अजूनही चर्चा सुरू आहेत. या कुंभमेळ्यात सर्वसामान्य लोकांसह अनेक राजकीय नेते तसेच अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, आता हा कुंभमेळा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Mahakumbh 2025)



'व्हर्च्युअल भारत' या प्रॉडक्शन हाऊसने महाकुंभ मेळ्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. व्हर्च्युअल भारतने इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला आहे. 'महासंगम' (Mahasangam) नावाच्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे आणि त्यासोबतच चित्रपटात कोणते कलाकार दिसणार आहेत हे देखील समोर आले आहे.


व्हर्च्युअल भारत' या प्रॉडक्शन हाऊसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिषेक बॅनर्जी, नीरज कबी आणि शहाना गोस्वामी दिसत आहेत. संगमाच्या मध्यभागी असलेल्या एका होडीत हे लोक बसलेले दिसतात. नीरज कबी आणि शहाना गोस्वामी आरती करत असताना, अभिषेक बॅनर्जी सेल्फी घेताना दिसत आहे. प्रोडक्शन हाऊसच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'व्हर्च्युअल भारत त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यास उत्सुक आहे. २०२५ च्या कुंभमेळ्यात चित्रित झालेला, महासंगम कुटुंब, वारसा आणि संगीताची एक खोलवरची कहाणी सादर करतो. ज्यांचे भावनिक वस्त्र जगातील सर्वात मोठ्या मानवी मेळाव्यामध्ये, महाकुंभात विणले गेले आहे'.






 










View this post on Instagram























 

A post shared by Virtual Bharat (@virtualbharat)




Comments
Add Comment