Friday, July 11, 2025

पुणे : धक्कादायक! पुणे जिल्ह्यातून दररोज १४ महिला बेपत्ता

पुणे : धक्कादायक! पुणे जिल्ह्यातून दररोज १४ महिला बेपत्ता

पुणे : एकीकडे शहरात बलात्काराच्या घटनांमुळे महिला खरेच किती सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असताना, शहरातून महिला व तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. १ जानेवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यानच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातून (पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि ग्रामीण) तब्बल ७६७ तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.


पुणे जिल्ह्याचा मोठा विस्तार आहे. तसेच, पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहर या दोन महत्त्वाच्या महानगरांचा समावेश या जिल्ह्यात आहे. नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांबरोबरच परप्रांतियांचा देखील मोठा ओढा या शहरांकडे आहे.



पुणे शहरातून २४३, पिंपरी- चिंचवडमधून २७१ तर पुणे ग्रामीणमधून २५३ महिला आणि तरुणी बेपत्ता झाली आहे. या बेपत्ता महिलांचा विचार केला, तर दिवसाला सुमारे चौदा तरुणी बेपत्ता झाल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून दिसून येते. काही बेपत्ता घटनांच्या नोंदीमध्ये काही महिला पुन्हा घरी परतल्याची माहिती आहे. परंतु, अनेक महिलांचा अद्यापही पत्ता लागला नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.

Comments
Add Comment