मुंबई : गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी निवडक जागा निश्चित केल्या असल्याचे वृत्त आहे. या ठिकाणी रस्त्यावरील प्रत्येक घडामोडीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लक्ष असेल. या आधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.
स्वारगेट बलात्कार प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर येथून अटक
सध्या मुंबईत जिथे व्हीआयपी, सेलिब्रेटी यांचा वावपर मोठ्या प्रमाणात आहे, अशा निवडक ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली आहे. या कॅमेऱ्याचे फायदे लक्षात येताच मुंबई पोलिसांनी निवडक गर्दीच्या जागांवर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे अर्थात चेहरे ओळखणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mahalaxmi Flyover : महालक्ष्मी येथील उड्डाणपूल २०२६ पर्यंत होणार खुला
फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, वाँटेड गुन्हेगारांना पकडणे ही कामं सोपी होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने काम करणारे सॉफ्टवेअर वापरुन चेहरे ओळखण्याची प्रक्रिया कमालीची वेगवान केली जाईल. मुंबईत निवडक गर्दीच्या ठिकाणी फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी एक प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी मुंबई पोलिसांच्यावतीने राज्य शासनाला सादर केला जाणार. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर फेशियल रेकग्निशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.