Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीवीज कर्मचाऱ्यांचा पी.एफ. ट्रस्ट धोक्यात!

वीज कर्मचाऱ्यांचा पी.एफ. ट्रस्ट धोक्यात!

कल्याण : राज्यातील तिनही वीज कंपन्यांतील (Electricity) किमान नव्वद हजार वीज कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र चालविला जाणारा तेरा हजार कोटीचा पी. एफ. ट्रस्ट (PF trust) भ्रष्ट विश्वास्तांमुळे धोक्यात आला आहे. मितीला सदर ट्रस्ट चा तोटा हा जवळपास दोन हजार कोटीच्या घरात असून, तो दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे वीज कंपन्यांतील नव्वद हजार वीज कर्मचाऱ्यांची कुटुंबे उघड्यावर पडण्याच्या भीतीने हवालदिल झाली आहेत.

Alibaug Boat Fire : अलिबागच्या समुद्रात मच्छीमारांच्या बोटीला आग

महिना अखेर पगारापोटी कपात होऊन येणारी पी.एफ. ची रक्कम ही योग्य व आर.पी.एफ.सी. च्या नियमात बसणाऱ्या सक्षम वित्तीय संस्थेत न गुंतवल्याने हा तोटा होत आहे. याला वीज प्रशासन व सहा वीज कामगार संघटनांचे मनमानी गुंतवणूक करणारे विश्वस्त जबाबदार आहेत. या विश्वस्तांनी जाणून बुजून केलेल्या अक्षम्य चूकीमुळे हे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या विश्वास्तांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार भाई जगताप यांनी केली आहे.

ज्या वित्तीय संस्था आरपीएफसीने घालून दिलेल्या गुंतवणुकी संबंधीच्या नियमात बसत नव्हत्या, या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून वीज कर्मचाऱ्यांची कुटुंबाची भविष्याची ठेव, जाणून बुजून ट्रस्टच्या विश्वस्तांनी या कंपन्यांमध्ये गुंतविली आहे. यात सरळ भ्रष्टाचार दिसत असल्याने संबंधित विश्वास्तांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे झाले आहे. या विश्वस्तांच्या कारभाराबाबत संघटनेचा व वीज कामगारांचा संशय अधिकच बळावला आहे. त्यामुळे हि ट्रस्ट ईपीएफओला जॉईन करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा नव्वद हजार वीज कामगारांची कुटुंबे आपल्या भविष्यासाठीची बचत गमावून बसतील. याविरूध्द आमदार भाई जगताप लवकरच येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -