विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झोपडीत राहणाऱ्यांना हक्काच्या घरात आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महापालिकेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात वास्तु विशारद व विकासकांची कार्यशाळा घेण्यात आली.
वसई विरार महानगरपालिकेच्या विविध परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने राबविण्याकरिता २८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आ. राजन नाईक, आ.स्नेहा दुबे पंडित, आ.विलास तरे यांच्यासह विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार तसेच मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड संघात भूकंप
ही योजना यशस्वी करण्यासाठी वास्तू विशारद व विकासक यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेबाबत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासोबतच संपूर्ण योजना व योजनेची अंमलबजावणी याची माहिती देखील या कार्यशाळातून वास्तू विशारद व विकासाकांना देण्यात आली. वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना अधिकृत आवाज देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिन्ही आमदारांनी सांगितले.