Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले!

Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले!

मुंबई : एकेकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गळ्यातील ताईत असलेले मीरा-भाईंदर महापालिकेचे एक माजी पालिका आयुक्त , तसेच शिंदे यांचे एकेकाळच्या खासगी सचिवावर शिंदे यांचा संताप अनावर झाल्याचे दृश्य पहायला मिळाले. स्वतःच्या वसई विरार महापालिका आयुक्तपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिफारस पत्रावर सही घेण्यावरून हा प्रकार झाल्याचे केबिन मधील प्रत्यक्ष दर्शीनि सांगितले. संताप अनावर झालेल्या उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या समक्ष स्वतःच्या केबिनमधून गेट आऊट म्हणत या अधिकाऱ्याला हाकलून लावले. शिंदे यांचा संताप इतका अनावर झाला होता की त्यांनी स्वतःचा महागडा चष्मा देखील समोरच्या टेबलावर जोरदार आपटला.



एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री असताना हे अधिकारी त्यांचे खासगी सचिव होते. शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची नियुक्ती मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्त पदावर करण्यात आली. हे महाशय शिंदे यांचे खाजगी सचिव असताना तसेच त्यानंतर ते मीरा-भाईंदर महापालिकेत आयुक्त म्हणून गेल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कामे करण्याचा सपाटा लावला होता. मीरा-भाईंदर महापालिकेत त्यावेळी टाऊन प्लॅनिंग विभागात भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला होता. याबाबत सातत्याने त्यांच्या विरोधात राज्य सरकारकडे तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या.


मात्र त्यानंतर त्यांच्याबाबत थेट ईडीकडे तक्रारी गेल्या आणि त्यानंतर मात्र ईडीची पिडा मागे लागली. मात्र तरीही मीरा-भाईंदर महापालिकेतून उचल बांगडी झाल्यानंतरही या अधिकाऱ्याची सिडकोमध्ये सह व्यवस्थापकीय संचालक पदावर वर्णी लावण्यात आली. तेथेही त्यांनी स्वतःचे उद्योग सुरूच ठेवले.


त्यात राज्यात सत्तांतर झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने या अधिकाऱ्याची सिडको मधून उचल बांगडी केली व त्यानंतर त्यांना कोणतीही क्रीम पोस्टिंग देण्यात आलेली नव्हती. मात्र मीरा-भाईंदर महापालिकेत वारमाप पैसे खाण्याची चटक लागलेल्या या अधिकाऱ्याने एम एम आर क्षेत्रातील मोठ्या महापालिकेत आयुक्त पदावर स्वतःची वर्णी लावून घेण्यासाठी लॉबिंग सुरू केली. यामध्ये वसई विरार महापालिका आयुक्त पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीचे पत्र त्यांनी शिफारस म्हणून तयार करून ते सही साठी शिंदे यांच्यासमोर ठेवले असता त्यावरून एकनाथ शिंदे हे संतापल्याचे सांगण्यात येते.

Comments
Add Comment