मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये इंग्लंड संघाची कामगिरी खास राहिलेली नाही. इंग्लंड संघ सलग दोन सामने हरल्याने ते सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. खराब कामगिरीनंतर जोस बटलरने वनडे आणि टी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बटलर १ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाला अफगाणिस्तानला ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पराभवानंतर बटलरने नेतृत्व सोडण्याचे संकेत दिले होते. बटलरने म्हटले होते की, मी यावेळेस कोणतेही भावनिक विधान करणार नाही. मात्र मी आणि इतर खेळाडूंबाबत विचार करेन. आम्ही शक्यतांवर विचार करू. हे खूप निराशाजनक आहे. मला वाटले होते की आम्ही सामना जिंकू शकतो. आणखी एक शानदार सामना मात्र आम्ही हरलो.
Jos Buttler has announced he will step down as England Men’s white ball captain.
More details 👇
— England Cricket (@englandcricket) February 28, 2025
आता जोस बटलरने मोठा निर्णय घेतला आहे. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाला भारतात आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्डकप २०२३ आणि वेस्ट इंडिज-अमेरिका आयोजित टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये अपयश मिळाले होते.