Monday, May 12, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

AUS vs AFG: पावसामुळे ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना रद्द, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

AUS vs AFG: पावसामुळे ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना रद्द, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

लाहोर: लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पावसामुळे ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेलाही फायदा मिळाला आहे. कारण त्यांचे सेमीफायनलमधील स्थान निश्चित झाले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने पहिल्यांदा खेळताना २७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ पूर्ण १३ षटकेही खेळू शकला नाही.


ऑस्ट्रेलिया संघाच्या १२.५ षटकांत १०९ धावा झाल्या असताना पावसाचा खेळ सुरू झाला. ट्रेविस हेडने तडाखेबंद खेळी साकारताना ५९ धावा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने १९ धावा केल्या होत्या. पाऊस भारतीय वेळेनुसार साडेसात वाजण्याच्या सुमारास आला होता मात्र काही काळाने पाऊस थांबला मात्र दीड तासानंतरही ग्राऊंड स्टाफ मैदान पुन्हा खेळण्यासाठी तयार करू शकले नाहीत.


हा सामना रद्द झाल्याने अफगाणिस्तानला सर्वात मोठे नुकसान झाले आहे. रद्द झाल्याने त्यांना केवळ एक गुण मिळाला असून त्यांचे एकूण ३ गुण झालेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आता एकूण ४ गुणांसह ग्रुप बीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

Comments
Add Comment