Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीAI Robot : चीनमध्ये एआय रोबोट नियंत्रणाबाहेर, लोकांवर केला हल्ला

AI Robot : चीनमध्ये एआय रोबोट नियंत्रणाबाहेर, लोकांवर केला हल्ला

बीजींग : चीनमधून एक अतिशय आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, एआय नियंत्रित असलेल्या रोबोटने अचानक लोकांवर हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोबोटने हल्ला केल्यावर तिथे उपस्थित असलेले लोक घाबरले.

या व्हायरल व्हिडिओमध्ये, ह्युमनॉइड रोबोट गर्दीकडे जात आहे आणि काही लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेमुळे तिथे गोंधळ निर्माण होतो. तथापि, सुरक्षा कर्मचारी वेळेत रोबोट नियंत्रित करतात. सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे रोबोटने असे वर्तन केले. दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

ईपीएफओने कायम ठेवला ८.२५ टक्के व्याजदर

चीनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एआय तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्याच्या संभाव्य धोक्यांबद्दल एक नवीन वादविवाद सुरू झाला आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना आणखी मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये दक्षिण कोरियामध्ये घडलेली घटना आपण कशी विसरू शकतो जिथे एका रोबोटने कामावर असताना पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

अलिकडेच क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधक डेबोरा ब्राउन आणि पीटर अॅलर्टन यांनी एआयच्या नकारात्मक परिणामांबद्दल सांगून जगभरातील लोकांमध्ये चिंता निर्माण केली आहे. AI robot in China या अभ्यासात असे म्हटले आहे की एआय आपली बौद्धिक क्षमता कमी करत आहे म्हणजेच आपल्याला ‘मूर्ख’ बनवत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -