Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीमहिला पर्यटकांना एमटीडीसीकडून ५० टक्के सवलत

महिला पर्यटकांना एमटीडीसीकडून ५० टक्के सवलत

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत, ही माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

एमटीडीसीने महिलांसाठी समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रीत पर्यटन धोरण अंमलात आणले आहे. महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. २०२४ मध्ये एमटीडीसीच्या महिला दिन विशेष सवलतीला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी १५०० हून अधिक महिला पर्यटकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, २०२५ मध्येही ही योजना राबवण्यात येणार आहे. महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात; असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले.

Mahasangam : कुंभमेळ्यावर होणार चित्रपट! ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

पर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिला पर्यटकांसाठी हा विशेष उपक्रम आहे एमटीडीसीची नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि खारघर (नवी मुंबई) येथील महिला-संचालित पर्यटक निवास पूर्णतः महिलांद्वारे संचलित केली जातात. यामध्ये रिसॉर्ट व्यवस्थापन, सुरक्षा, टॅक्सी सेवा, स्वच्छता, हॉटेलिंग आदी सर्व जबाबदाऱ्या महिलांकडेच आहेत. यामुळे महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत; असे पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले.

बदलापूर – नवी मुंबई बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार

महिला पर्यटकांसाठी ३० दिवसांची विशेष सवलत

यंदा १ ते ८ मार्च आणि वर्षभरातील इतर २२ दिवस असे एकूण ३० दिवस ५० टक्के सवलत असून या २२ दिवसांची माहिती एमटीडीसीच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. एमटीडीसीच्या पर्यटन स्थळांवर महिला बचत गटांसाठी स्टॉल्सची सुविधा दिली जाईल. महिला पर्यटकांसाठी विशेष साहसी आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -