मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत.
“आई” महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. शंभूराज देसाई म्हणाले की, एमटीडीसीने महिलांसाठी समर्पित ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणले आहे.
AI Robot : चीनमध्ये एआय रोबोट नियंत्रणाबाहेर, लोकांवर केला हल्ला
महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यामुळे सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, २०२५ मध्येही ही योजना राबवण्यात येणार आहे. महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात.