मुंबई : म्हाडा (Mhada) मुख्यालयातील विविध मंडळांच्या कार्यालयात दलाली करणाऱ्या तब्बल ४० दलालांवर दक्षता विभागाकडून (Vigilance Department) कठोर कारवाई करण्यात आली आहे. या दलालांना म्हाडाच्या मुख्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांची कामे दलालांशिवाय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वेळेअभावी नागरिकांना आपल्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यास वेळ मिळत नाही. यातच कर्मचारी अधिकारी इतर कामांमध्ये व्यस्त असल्याने नागरिकांना अनेकदा म्हाडात यावे लागते. वेळेची बचत आणि झटपट काम करून घेण्यासाठी काही लोक दलालांची मदत घेतात.

मुंबई : मुंबईतील चिंचपोकळी परिसरात भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. रंगारी बदक चाळ परिसरातील निर्मल पार्क इमारतीमधील काही मजल्यांना आग लागली आहे. ...
शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये अशीच यंत्रणा निर्माण झाली आहे. मात्र घर देण्याचे खोटे आश्वासन देत दलाल नागरिकांची फसवणूक करतात. फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये काही दलालांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. अशा व्यक्तींना म्हाडा मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न काही दलाल करतात.
अशा सुमारे ३० दलालांना म्हाडाच्या मुख्य दक्षता आणि सुरक्षा विभागाने काळ्या यादीत टाकले होते. यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये आणखी काही दलालांच्या तक्रारी दक्षता विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यानुसार आणखी १० दलालांना काळ्या यादीत टाकून त्यांना म्हाडा कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.