नातेवाईकांनी फोडल्या बसच्या काचा
अलिबाग : अलिबाग एसटी स्थानकाच्या बाहेर (Alibaug ST depo) राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार राडा घातला.
दोन बसचा भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग एसटी आगाराबाहेर दोन बसचा भीषण अपघात झाला. या बसच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचे नाव जयदीप बना असे आहे. या घटनेनंतर मृत्यू व्यक्तीच्या संतप्त नातेवाईकांनी अपघातग्रस्त एसटीच्या काचा फोडल्या. तसेच काही वेळ मयताच्या नातेवाईकांनी एसटी बस रोखून धरली होती. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू
अलिबाग एसटी आगाराबाहेर या दोन्ही एसटी बसची झालेली धडक इतकी जोरदार होती की, सदर अपघातात एका रिक्षेचेही नुकसान झाले आहे. दोन्ही बसेस अलिबाग बस स्थानकात शिरत असताना हा अपघात झाला. या दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक
यामुळे अलिबाग एसटी आगाराबाहेर मोठा जमाव तयार झाला होता. या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांना जमावाला पांगवताना मोठी कसरत करावी लागली. या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.