Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार सामना

IND vs PAK: क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार सामना

मुंबई: क्रिकेट चाहत्यांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. त्यांना या वर्षी पुन्हा एकदा भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही संघादरम्यान नुकताच एक सामना झाला होता. हा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतर्गंत २३ फेब्रुवारीला झाला होता. यात भारतीय संघाने विजय मिळवला.


आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. या वर्षी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात टक्कर होईल. हा सामना आशिया कप २०२५ अंतर्गत खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट काऊंन्सिलने आशिया कपसाठी संभाव्य विंडो तयार केली आहे.


ही स्पर्धा या वर्षी सप्टेंबरमध्ये होऊ शकते. यावेळेस आशिया कप यूएईमध्ये होऊ शकतो. या स्पर्धेचे यजमानपद भारतच करणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तानसोबत जे झाले ते पाहता एसीसीने आशिया कपसाठी न्यूट्रल ठिकाण ठरवले आहे. दरम्यान, अद्याप फायनल ठिकाण निश्चित नाही.



भारत-पाकिस्तान यांच्यात होणार ३ सामने?


हा आशिया कप २०२५मध्ये सर्व ८ संघादरम्यान फायनल सामन्यासह १९ सामने खेळवले जातील. भारत आणि पाकिस्तानशिवाय या स्पर्धेत श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग यांचा समावेश असेल. सर्व संघांना २ ग्रुपमध्ये विभागले जाईल.

Comments
Add Comment