
चेन्नई : हिंदी भाषा जबरदस्तीने लादल्यामुळे गेल्या १०० वर्षांत २५ उत्तर भारतीय भाषा नष्ट झाल्याचा आरोप तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आज, गुरुवारी केला.
यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या एका पोस्टमध्ये स्टॅलिन म्हणाले की, एकाधिकारशाही हिंदी ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न प्राचीन भाषांना मारत आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहार हे कधीच हिंदी पट्टे नव्हते. आता त्यांच्या मूळ भाषा भूतकाळाचे अवशेष बनल्या आहेत.

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान आज येथे १ हजार ७४० ...
इतर राज्यातील माझ्या प्रिय बहिणी आणि बंधूंनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की, हिंदीने किती भारतीय भाषा गिळंकृत केल्या आहेत?
भोजपुरी, मैथिली, अवधी, ब्रज, बुंदेली, गढवाली, कुमाऊनी, मगही, मारवाडी, मालवी, छत्तीसगढी, संथाली, अंगिका, हो, खारिया, खोरथा, कुर्मली, कुरुख, मुंडारी आणि इतर अनेक भाषा आता जगण्यासाठी धडपडत आहेत, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपाने स्टॅलिन यांचे विधान मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे.