Thursday, March 20, 2025
Homeक्रीडाआंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळाडूने खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास

आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळाडूने खेळता खेळता घेतला अखेरचा श्वास

चंदिगड : आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळाडूने खेळता खेळता अखेरचा श्वास घेतला. आंतरविद्यापीठ वुशु (Wushu) चॅम्पियनशिप सुरू असताना खेळाडू मोहित शर्माचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मोहित शर्मा २१ वर्षांचा होता आणि ८५ किलो वजनी गटातून खेळत होता.

मंत्री नितेश राणेंनी केली कुणकेश्वराची पहिली पूजा

खेळता खेळता मोहितला हृदयविकाराचा झटका आला. तो खेळता खेळता खाली पडला. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे लगेच लक्षात आले नाही. पंचाने नियमानुसार एक, दोन तीन… असे आकडे मोजले आणि मोहित उठत नाही हे बघून डॉक्टरांना बोलावले. फिजिओथेरपिस्टने तपासणी केली. ही प्रक्रिया सुरू असतानाच पंचाने मोहितच्या प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषीत केले. तोपर्यंत तपासणी झाली. फिजिओथेरपिस्टने मोहितला तातडीने रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर मोहितला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली आणि हृदयविकाराच्या झटक्याने मोहित शर्माचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Cabinet Decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय

याआधी चॅम्पियनशिप दरम्यान मोहित खेळण्यासाठी रिंगमध्ये आला. समोर त्याचा प्रतिस्पर्धी होता. पहिली फेरी झाली. नंतर दुसऱ्या फेरीचा खेळ सुरू झाला. खेळता खेळता मोहित खाली पडला. तो पोटावर पडला होता. खाली पडला त्याचवेळी मोहितला हृदयविकाराचा झटका आला होता. पण हा झटका एवढा तीव्र होता की मोहितला वाचवण्याची संधीच डॉक्टरांना मिळाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Champions Trophy: अफगाणिस्तानसाठी वरदान ठरणार पाऊस! सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी

चॅम्पियनशिप दरम्यान घडलेल्या घटनेची चौकशी होणार आहे. मोहितचे पोस्टमॉर्टेम करुन नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातलगांच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -