चंदिगड : आंतरविद्यापीठ स्पर्धेत खेळाडूने खेळता खेळता अखेरचा श्वास घेतला. आंतरविद्यापीठ वुशु (Wushu) चॅम्पियनशिप सुरू असताना खेळाडू मोहित शर्माचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मोहित शर्मा २१ वर्षांचा होता आणि ८५ किलो वजनी गटातून खेळत होता.
मंत्री नितेश राणेंनी केली कुणकेश्वराची पहिली पूजा
सिंधुदुर्ग : महाशिवरात्रीनिमित्त सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वराची पहिली पूजा केली. ...
खेळता खेळता मोहितला हृदयविकाराचा झटका आला. तो खेळता खेळता खाली पडला. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे लगेच लक्षात आले नाही. पंचाने नियमानुसार एक, दोन तीन... असे आकडे मोजले आणि मोहित उठत नाही हे बघून डॉक्टरांना बोलावले. फिजिओथेरपिस्टने तपासणी केली. ही प्रक्रिया सुरू असतानाच पंचाने मोहितच्या प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषीत केले. तोपर्यंत तपासणी झाली. फिजिओथेरपिस्टने मोहितला तातडीने रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानंतर मोहितला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली आणि हृदयविकाराच्या झटक्याने मोहित शर्माचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
Cabinet Decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे पाच महत्त्वाचे निर्णय
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातीन जनतेच्या हिताचे पाच महत्त्वाचे निर्णय ...
याआधी चॅम्पियनशिप दरम्यान मोहित खेळण्यासाठी रिंगमध्ये आला. समोर त्याचा प्रतिस्पर्धी होता. पहिली फेरी झाली. नंतर दुसऱ्या फेरीचा खेळ सुरू झाला. खेळता खेळता मोहित खाली पडला. तो पोटावर पडला होता. खाली पडला त्याचवेळी मोहितला हृदयविकाराचा झटका आला होता. पण हा झटका एवढा तीव्र होता की मोहितला वाचवण्याची संधीच डॉक्टरांना मिळाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Champions Trophy: अफगाणिस्तानसाठी वरदान ठरणार पाऊस! सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी
मुंबई: पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळवल्या जात असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तान संघासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ...
चॅम्पियनशिप दरम्यान घडलेल्या घटनेची चौकशी होणार आहे. मोहितचे पोस्टमॉर्टेम करुन नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातलगांच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.