मुंबई : अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) सोशल मीडियावर त्याच्या आगामी ‘भूतनी’ या चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. संजय दत्त हा लवकरच एका हॉरर-कॉमेडी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये संजय दत्त भूतनीसोबत भांडताना दिसत आहे. चित्रपटाची घोषणा करत संजय दत्तने लिहिले की, ‘या गुड फ्रायडेला घाबरण्यासाठी एक नवीन तारीख मिळाली आहे, FridayThe18th! यापूर्वी कधीही न पाहिलेल्या हॉरर, अॅक्शन आणि विनोदासाठी सज्ज व्हा. भूतनी १८ एप्रिलला चित्रपटगृहात धुमाकूळ घालणार. ‘ दरम्यान, टीजरमधील संजय दत्तचा लुक सर्वांच्या पसंतीस पडला आहे.
या आगामी चित्रपट भूतनीमध्ये संजय दत्तसह मौनी रॉय, पलक तिवारी आणि सनी सिंग महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. ही एक प्रेमकथा आहे. ज्यामध्ये मौनी रॉय भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझर पाहून, चित्रपटाविषयी उत्साह खूपच वाढला आहे.
संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘बागी 4’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज केला जाणार आहे. याशिवाय तो ‘हाऊसफुल 5’ मध्ये देखील दिसणार आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…