Friday, March 28, 2025
Homeमहाराष्ट्रमहापालिकेच्या वतीने आयोजित पवना थडी यात्रेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी

महापालिकेच्या वतीने आयोजित पवना थडी यात्रेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी

४ ते ५ लाख लोकांनी दिली पवनाथडी जत्रेस भेट

पिंपरी : शहरी आणि ग्रामीण संस्कृतीने नटलेल्या चार दिवसीय पवनाथडी जत्रेचा सोमवारी समारोप झाला. १७ वर्षांची परंपरा अबाधित ठेवत यावर्षीही महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या जत्रेस नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी सुमारे ४ ते ५ लाख लोकांनी पवनाथडी जत्रेस भेट देऊन विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला, वस्तू खरेदी केल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच सर्व सहभागी बचत गटांची सुमारे १.५ ते १.२५ कोटी रुपयांची उलाढाल या पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून झाली, अशी माहिती समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी दिली.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्ये विकसित व्हावी तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दि.२१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या पवनाथडी जत्रेचा समारोप झाला. या समारोप कार्यक्रमावेळी सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, प्रशासन अधिकारी पुजा दुधनाळे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसदस्य अशोक सोनवणे, सागर आंगोळकर, सुषमा तनपुरे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा ठाकर, स्वाती गुरव, अनुश्री धोत्रे तसेच विविध विभागांचे महापालिका अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

महिला तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग बचत गटांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे ३८६ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थांचे २१७ स्टॉल, तर मांसाहारी पदार्थाचे १३० तसेच दिव्यांग बचतगटांना ०५, सामाजिक संस्था १४, तृतीयपंथी बचतगट ०४ असे एकूण ७५६ स्टॉल पवनाथडी जत्रेमध्ये होते. सोडत पद्धतीने स्टॉल वाटप करताना काही महिलांच्या हाती काढण्यात आलेल्या चिट्ठीत त्यांचाच नंबर निघाला होता. या महिला बचत गटांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यामध्ये नानाश्री महिला बचत गट, ब्राईट महिला बचत गट, नवीन परिवर्तन महिला बचत गट, अश्विनी स्वयंसिद्धा महिला बचत गट, केजीएम महिला बचत गट, शिवसंगमेश्वर महिला बचत गट यांचा समावेश होता. तसेच यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तृतीयपंथी, दिव्यांग बचत गट आणि जनरल, शाकाहारी, मांसाहारी स्टॉलधारक महिला बचत गटांचा सन्मान करण्यात आला. पवनाथडी जत्रेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय, अशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मंडळे, सामाजिक संस्थांचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी आभार मानले.

समारोपीय कार्यक्रमाच्या शेवटी नृत्य नाट्य आणि संगीताचा त्रिवेणी संगम असलेला जगतसुंदरी हा बहारदार लावण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. यावेळी पवनाथडी जत्रेत सहभागी झालेल्या ७५० पेक्षा जास्त महिला बचत गटांना तसेच जत्रेमध्ये सहकार्य करणाऱ्या महापालिकेच्या विविध विभागांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रशासन अधिकारी पूजा दुधनाळे यांनी मानले. तसेच सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अभिजीत राजे आणि पौर्णिमा भोर यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -