Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Punjab News : पंजाब सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

Punjab News : पंजाब सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

अमृतसर : पंजाबच्या पठाणकोट येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर (एलओसी) सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले आहे. पठाणकोट मार्गे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना जवानांनी त्याला इशारा दिला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे जात राहिला. धोका ओळखून बीएसएफ जवानांनी घुसखोराला ठार मारले.



यासंदर्भातील माहितीनुसार आज, बुधवारी सकाळी ताशपाटन सीमा चौकीवरील जवानांना सीमेपलीकडे संशयास्पद हालचाली दिसल्या. एकजण भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. सतर्क सैनिकांनी त्याला इशारा दिला, पण त्याने लक्ष दिले नाही. तो पुढे जात राहिल्याने बीएसएफ जवानांनी त्या घुसखोराला ठार मारले. घुसखोराची ओळख आणि हेतू शोधला जात असून सतर्क बीएसएफ जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.

Comments
Add Comment