Sunday, April 20, 2025
HomeदेशMahakumbh: महाशिवरात्रीला महाकुंभमध्ये आज महास्नान, लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी

Mahakumbh: महाशिवरात्रीला महाकुंभमध्ये आज महास्नान, लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी

प्रयागराज: आज महाशिवरात्रीला महाकुंभचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या महास्नानासाठी लोकांची मोठी गर्दी संगमावर पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारसाठी आजचा दिवस एखाद्या महत्त्वाच्या परीक्षेपेक्षा काही कमी नाही.

आज दोन कोटींहून अधिक भक्तगण महाकुंभमध्ये येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर मेळावा प्रशासनाने सर्व तयारी आधीच पूर्ण केली आहे.

गेल्या ४४ दिवसांमध्ये महाकुंभमधील ६५ कोटींहून अधिक भक्तगण महाकुंभमध्ये स्नानाचा आनंद घेऊन गेले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षाकडून संगम जल पासून ते व्यवस्थेवर अनेक सवाल करण्यात आले. मात्र आतापर्यंत अनेक आव्हानांचा सामना यशस्वीपणे करण्यात आला आहे.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमामध्ये आस्थेची डुबकी घेण्यासाठी पोहोचलेल्या भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाकुंभमध्ये २५ फेब्रुवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.३४ कोटीहून अधिक लोक पोहोचले होते. याआधी २४ एप्रिलपर्यंत एकूण ६३.३६ कोटी लोकांनी स्नानाचा आनंद घेतला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -