Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

महाशिवरात्रीची आंघोळ बेतली जिवावर, तीन युवकांचा बुडून मृ्त्यू

महाशिवरात्रीची आंघोळ बेतली जिवावर, तीन युवकांचा बुडून मृ्त्यू

चंद्रपूर : राजुरा तालुक्यापासून जवळ असलेल्या चुनाळा येथील घराजवळील नागरिकांसोबत महाशिवरात्रीच्या पर्वावर वर्धा नदी येथे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या तुषार शालिक आत्राम (१७) मंगेश बंडू चणकापुरे (२०) अनिकेत शंकर कोडापे (१८) यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २६) घडली आहे.


महाशिवरात्री निमित्त चुनाळा येथील काही नागरिक चुनाळा येथील वर्धा नदी घाटावर आंघोळ करण्यासाठी जात असता त्यांच्यासोबत घराजवळील तुषार आत्राम, मंगेश चणकापुरे, अनिकेत कोडापे हे तिन्ही युवक आंघोळ करण्यासाठी गेले नदीपात्रात महिला एका बाजूला आंघोळ करीत असताना महिलापासून दूर काही अंतरावर जाऊन तिन्ही युवक आंघोळ करीत होते. यावेळेस त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यामध्ये बुडू लागले वेळेस त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला असता जवळ असलेला रामचंद्र रागी या युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही.


घटनेची माहिती चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांना मिळताच त्यांनी राजुरा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी राजुरा पोलिस पोहचली सदर घटना बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बल्लारपूर पोलिस सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा शोध घेऊ लागले. राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी आपत्ती विभाग चंद्रपूर येथे फोन करून बोटीची व्यवस्था केली व बोटीद्वारे मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे. यात दोन युवकांचे मृतदेह मिळाले होते.d

Comments
Add Comment