Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

२०२६ पासून बदलणार CBSE बोर्ड परीक्षेची सिस्टीम, वर्षातून दोन वेळा होणार १०वीची परीक्षा

२०२६ पासून बदलणार CBSE बोर्ड परीक्षेची सिस्टीम, वर्षातून दोन वेळा होणार १०वीची परीक्षा

मुंबई: वर्ष २०२६ पासून सीबीएसई बोर्डाच्या(CBSE) दहावीच्या परीक्षेमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. बोर्डाने या बदलाबाबत निर्णय घेतला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार २०२६ पासून १०वीची बोर्डाची परीक्षा वर्षात दोन वेळा आयोजित केली जाईल. या बदलाचे मुख्य कारण विद्यार्थ्यांना आपली तयारी चांगली करण्यासाठी तसेच परीक्षेत चांगली कामगिरी करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.



सध्या अशी होतेय परीक्षा


सध्या १०वी आणि १२वीच्या बोर्ड परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान आयोजित केल्या जातात. कोरोना महामारीमुळे सीबीएसईने एक विशेष उपायच्या रूपात परीक्षांना दोन सत्रामध्ये विभाजित केले होते. दरम्यान, स्थिती सामान्य होताच बोर्डाने पुढच्याच वर्षापासून आपली जुनी सिस्टीम सुरू केली.



कशी असेल नवी परीक्षा सिस्टीम?


सीबीएसईनुसार १०वी परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये असेल तर दुसरा टप्पा मेमध्ये आयोजित केला जाईल. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये बसण्याची संधी मिळेल. मात्र हे गरजेचे नसेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर ते दुसरी परीक्षा देऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार १०वी बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते सहा मार्च २०२६ पर्यंत असेल. दुसरा टप्पा ५ मे ते २० मे २०२६ पर्यंत आयोजित असेल.



विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?


विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळेल. जर पहिल्या परीक्षेत चांगली कामगिरी झाली नसेल तर त्यांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला लक्षात घेतले जाईल. तसेच या बदलामुळे परीक्षेची भीती कमी होईल आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक संधी मिळेल.

Comments
Add Comment